हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

हिंगोली शहरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

 महत्वाचे
श्री. त्र्यंबकराव लोंढे व प्रा. विकास कल्याणकर यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व यावर आपले विचार मांडले,

हिंगोली,:- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पुतळा समिती व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात करण्यात आला,यावेळी श्री. त्र्यंबकराव लोंढे व प्रा. विकास कल्याणकर यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व यावर आपले विचार मांडले, या कार्यक्रमाला मा.आ.गजाननराव घुगे भाजप जिल्हाध्यक्ष, दिलीपराव चव्हाण मा. नगराध्यक्ष, मनोज आखरे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष, खंडेरावकाका सरनाईक, त्र्यंबकराव लोंढे,शिवाजीराव ढोकर पाटील, राजकुमार वायचाळ,अमोल जाधव,प्रा.विक्रम जावळे,प्रल्हाद शिंदे,माणिकराव देशमुख,ज्योतीताई कोथळकर, कांताताई कल्याणकर, साधनाताई हेंबाडे, अरुणा अंभोरे, पंडित अवचार, हरिभाऊ मुटकुळे, पंडित सिरसाट, बाबाराव शृंगारे,गोपाल सरनायक,परसराम हेंबाडे, बळीरामजी कल्याणकर,विश्वास वानखेडे,विकास कल्याणकर,शिवराज सरनाईक, महेश राखोंडे, गजानन हाके,गजानन जाधव व मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते.

हिंगोली,

सत्यलेख · 06-06-2025 · 11:03 AM