अमरावती - दि. २४
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटनेचे केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाच्या निमित्याने राज्यभरात २२ जून पासून विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.
याच उपक्रमाचे नियोजनातून संघटनेचे केंद्रीय संपर्कप्रमुख प्रा.रवींद्र मेंढे यांचा २२ जूनला वाढदिवस संपन्न झालेला आहे.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जूनला केंद्रीय कार्यकारिणी बैठक व वृक्षारोपण , सदस्यांना वीमा व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी जिल्हा बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यांतील कार्यकारिणी, नुतनीकरण, व जिल्हा, तालुका स्तरावर वृक्षारोपण, रोगनिदान शिबिर, पत्रकार मेळावा, शालेय साहित्य वाटप आपल्या जिल्हा, तालुका स्तरावर करावे असे ठरविण्यात आलेले आहे.
१ जुलै रोजी केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त व दिनांक ३० जुन रोजी प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या वाढदिवस निमित्याने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने ३० जुनला केंद्रीय कार्यालय पत्रकार पंत संस्था शिरजगांव कसबा येथील कार्यालयात कैलास बापू देशमुख यांचा
"कार्य गौरव" सत्कार समारंभ दुपारी ३:०० वाजता आयोजित केला आहे. या मध्ये अमरावती जिल्ह्यातील पत्रकार व केंद्रीय कार्यकारिणी हजर राहणार आहे. संघटनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात वरील प्रमाणे कार्यक्रम राबवावे.
व तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीला पाठवावा. असे संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असल्याचे संघटनेचे
मनोहर सुने
(केंद्रीयसंस्थापकअध्यक्ष ),युसुफखान
(केंद्रीय कार्याध्यक्ष)
सुरेश सवळे
(केंद्रीय महासचिव)
अशोक पवार
(केंद्रीय सचिव )
राजेंद्र भुरे
(केंद्रीय उपाध्यक्ष )
प्रदिप जोशी
(केंद्रीय उपाध्यक्ष )
राजेंद्र ठाकरे
(महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) यांनी प्रसिद्धीस काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अमरावती
सत्यलेख ·
24-06-2025
·
11:16 PM