हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

लोकशाहीच्या हत्येचे काळे सुवर्णवर्षच म्हणावे.!

अंतिमहत्व
विशाल वसंतराव मुळे आजेगावकर.

सुवर्ण महोत्सव चांगल्या कार्याला आपण म्हणत असतो. कोणत्याही एखाद्या आदर्श विषयाला पन्नास वर्ष झाले असतील तर आपण त्याला सुवर्णवर्ष म्हणत असतो. पण भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्या नंतर हा आजचा आणीबाणीला पन्नास वर्ष झाले. ह्याला काळे सुवर्णवर्ष लोकशाहीच्या हत्येचे म्हणावे लागेल. पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या तशा कणखर नेत्या होत्या. १९६६ ला सुरू झालेला त्यांचा पंतप्रधान पदाचाकाळ हा यथातथाच होता. पण १९७२ ला पाकिस्तानचे दोन भाग केल्यानंतर बांगलादेश निर्मिती नंतर इंदिरा गांधी ह्यांची प्रतिमा देशभरात एक कणखर व्यक्ती म्हणून झाली होती. इंदिरा गांधी ह्यांना तेंव्हापासून अहंकार चढला होता. जयप्रकाश नारायण जवळ जवळ राजकारणातून त्यावेळी अलिप्त होते. पण गुजरात मधील विद्यार्थी आंदोलनाने मुख्यमंत्री चिमनभाई पटेल सरकार गेले होते आणि बिहार मधील मुख्यमंत्री अब्दुल गफुर सरकार विरोधातील विद्यार्थी आंदोलनामुळे बरखास्तीच्या मार्गावर होते. आणि अशातच परत एकदा जयप्रकाश नारायण ह्यांनी काँग्रेस काळातील भ्रष्टाचार पाहता परत एकदा जनतेसाठी रस्त्यावर येण्याचा मोठा निर्णय घेतला आणि पुढे ०८/०४/१९७४ जयप्रकाश नारायण ह्यांनी पाटण्यात मुक यात्रा काढली आणि आणि ०५/०६/१९७५ एक मोठी सभा घेतली त्याच नेतृत्व हे स्वतः जे.पी. ह्यांनी केले. अशातच इंदिरा गांधी ह्यांची अडचण परत एक वाढली आणि जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी रेल्वे कर्मचारी ह्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत, ०८/०५/१९७५ पन्नास हजार कर्मचारी मंडळींना बाहेर राहायला सांगितले, इंदिरा गांधी ह्यांनी ते आंदोलन देखील दडपले, इंदिरा गांधीच्या विरोधात मोठा जनक्षोभ झाला. इतकचं नाही तर फक्त सी.पी.एम सोडून भारतातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष हे इंदिरा काँग्रेसच्या विरोधात एकत्र आले होते. हा ही त्रास इंदिरा गांधी ह्यांना होता. आणि अशातच इंदिरा गांधी ह्यांचा मुलगा संजय गांधी हे राजकारणात जास्त लक्ष घालत होते. मागील चार ते पाच वर्षापासून महत्त्वाचे निर्णय देखील संजय गांधी घेत होते. इंदिरा गांधीच्या चरित्रकार पुपुल जयकर ह्या लिहितात "इंदिरा गांधी ह्याची इच्छा नसतांना देखील अनेक प्रकरणात संजय गांधी भूमिका घेत होते". आणीबाणीच्या दिवशी देखील मुख्य भूमिकेत संजय गांधी हेच होते. १९७४ पासून ते दोन वर्ष देश फक्त दोन व्यक्तींची चर्चा करायचा इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण. ह्या आणीबाणीला १९७१ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निकालाची देखील किनार आहे. तो विषय ह्या लेखाच्या शेवटच्या भागात येईल... २५ जून १९७५ ची रात्री आणि २६ जून १९७५ उजेडता सकाळी तीन वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस अध्यक्ष देवकांत वर्मा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री तथा इंदिरा गांधीचे मित्र देशाचे एक मोठे वकील सिद्धार्थशंकर रे हे बसले होते फक्त कशासाठी तर देशात आणीबाणी लागू झाली आहे ह्याचे वर्णन देशवासीयांना कसे करावे ह्यासाठी. भारतातील कुण्याही व्यक्तीला आणीबाणी काय असते, ती कोणत्या कलामखाली लावता येते, त्याचे अधिकार कुणाला असतात ह्याची पुसटशी कल्पना देखील कुणाला नव्हती. अगदी दुसरे दिवशी म्हणजे २६ जून १९७५ सकाळी सहा वाजता पंतप्रधान कार्यालयात emergency meeting address for prime minister of India Indira Gandhi ह्यांनी बोलावली होती. बैठकीला पंधरा केंद्रीय मंत्री हजर होते, त्यातल्या एकाही मंत्र्यांना माहिती नव्हत की सहा तासात देश किती बदलला. सिद्धार्थ रे हे इंदिरा गांधीचे भाषण तपासात बसले होते, देशात आणीबाणी राष्ट्रपतींनी लावली हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, आणि इंदिरा गांधींच्या दुसरा बिंदू होता, की एक व्यक्ती सैन्याच्या सोबत हात मिळवणी करताना सरकार बरखास्त करायचे स्वप्न पाहत आहे. इंदिरा गांधी त्या व्यक्तीचं नाव मात्र घेत नसतं पण सर्वांना माहिती होत की ती एक वक्ती म्हणजे जयप्रकाश नारायण होते. आणि राष्ट्रपतींनी आणीबाणी लावली हे हि आपल्या भाषणातून सांगत होत्या तेंव्हा मी तुम्हाला सांगितल पाहिजे राष्ट्रपती फकरुद्दिन अली अहमद देखील इंदिरा गांधींच्या कृपेने राष्ट्रपती झाले होते. ( ते कसे हे सांगायला एक स्वतंत्र भाग होईल, ती ही वेळही नाही आणि सध्याची आवश्यकता देखील नाही.) त्यामुळे सर्व सत्ता केवळ आणि केवळ इंदिरा गांधीच्या आणि संजय गांधीच्या हातात आली होती. होय संजय गांधींच्या हातात, त्या संदर्भातील एक मुद्दा मी तुम्हाला आवर्जून सांगितला पाहिजे. जेंव्हा आणीबाणी लागू झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी देशाचे गृहराज्यमंत्री ओमप्रकाश मेहता, सिद्धार्थ रे ह्यांना सांगतात की देशातील सर्वच वर्तमानपत्राची लाईट बंद केली आहे, आणि सर्व हायकोर्ट बंद आसणार आहेत, तेंव्हा रे म्हणतात असं काहीही नाही, मला इंदिरा गांधी ह्यांनी सांगितल आहे वर्तमानपत्र आणि हायकोर्ट चालू राहतील. पण इंदिरा गांधी ह्यांनी सूचना देऊन सुद्धा हे दोन्ही संस्था बंद होत्या. आणि इंदिरा गांधींचं prime minister speech of address for nation हे सर्व ठिकाणावरून का जाहीर करण्यात आलं नाही म्हणून तत्कालीन सूचना आणि प्रसारण मंत्री इंद्रकुमार गुजराल ह्यांना पन्नास मिनिटात मंत्र्यालय बदलून मिळालं, ह्याची पुसटशीही कल्पना इंदिरा गांधी ह्यांना नव्हती. ह्याचा अर्थ असा होता की इंदिरा गांधी ह्यांचे अधिकार कुणीतरी दुसरच म्हणजे त्यांचा मुलगा संजय गांधी चालवत होते. संजय गांधी केंद्रीय गृहराज्यमंत्री ओमप्रकाश मेहता ह्यांना म्हणतात की, तुम्हा लोकांना माहिती नाही की सरकार कसं चालवायचं असतं, आणि पुढे बोलतांना म्हणतात मला सर्व विद्यापीठातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणाऱ्या प्राध्यापक मंडळींची यादी लवकरात लवकर काढून द्या, आणि तिथून पुढे जवळ जवळ सर्व प्राध्यापक अटक होतात आणि जे भूमिगत राहिले तितकेच राष्ट्र कार्यासाठी पुढे जातात. पुढे संघाचा प्रत्येक मोठा जबाबदार अधिकारी अटक होतो. इंदिरा गांधीच्या काँग्रेस वगळता बाकी राजकीय पक्षाचे बडे नेते बंदिवासात असतात. जयप्रकाश नारायण, मुरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, सेवा कार्यकर्ते, सत्यनिष्ठ पत्रकार, बुद्धिवंत, अटक होते. देशाला ना हायकोर्ट असतो, ना सुप्रीम कोर्ट असतो, ना कोणत्याही प्रकारची न्यायसंस्था देशात शिल्लक राहते. केवळ एक हुकूम इंदिरा गांधी. इंदिरा गांधी म्हणेल तेच खरं, काँग्रेस म्हणेल तीच पूर्व अशी देशाची स्थिती झाली होती. परिस्थिती इतकी भीषण होती की कोणताही अधिकार नागरिकांना न उरल्यामुळे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आणि संपूर्ण घटनेची पायमल्ली इंदिरा गांधींनी केल्यामुळे, इंदिरा गांधी शिवाय इतर कोणाकडेही अधिकार नव्हते. २५ जून १९७५ मध्यरात्री आणीबाणी लागू झाली होती. देशातील ठराविक तीन चार मंत्री वगळता, आणि इंदिरा गांधी ह्यांचे दोन चार मित्र वगळता आणि संजय गांधी चे मित्र सोडता कोणालाही ह्याची कल्पना नव्हती. देश तुरुंग झाला होता. अनेक निष्पाप नागरिक उद्ध्वस्त झाले होते, प्रचंड परिवार नेस्तनाबूत झाले होते. काही त्या काळात काळाचे शिकार झाले, काही सरकारचे शिकार झाले तर काही नेत्यांचे शिकार झाले होते. काही तासात ह्या जगातील सर्वात मोठी लोकशाही, हुकूमशाहीत बदलली होती. आणि त्याच दिवसाला आज पन्नास वर्ष झाले आहेत. हा दिवस राष्ट्रीय काळा दिवसच म्हणावा लागेल असं मला वाटतं. आणीबाणी लागण्याचे नेमक कारण, ना इंदिरा गांधी सांगू शकल्या, ना संजय गांधी सांगू शकले, ना त्या काळातील काँग्रेसचा कोणताही बडा नेता तो कारण सांगू शकला. फक्त गांधी घराण्याला आणि काँग्रेस पक्षाला ह्या देशाच्या सामान्य नागरिकांना आणि बिगर काँग्रेसी नेत्यांना एकच दाखवायचं होतं की हा देश आणि ह्या देशावरची सत्ता ही काँग्रेस आणि गांधी घराण्याची आहे. आणि त्यांनी तेच केलं. अनेक लोकं लढले आणि ह्या देशाला परत लोकशाही रुजवण्यासाठी मदत केली... आज काही विरोधक म्हणतात ह्या देशात अघोषित आणीबाणी आहे. आणि ही आणीबाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला सांगावी. संघाला काय सांगायचं आणि काय नाही इतकी उंची त्या नेत्यांची कधीही नसते. आणीबाणी नंतर ह्या देशाला परत लोकशाही प्रदान करतांना भारतीय जनता आणि काँग्रेसेतर सी.पी.एम वगळता बरेच राजकीय पक्ष, त्यात भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची भूमिका राहिली आहे हे मी तुम्हाला सांगितल पाहिजे. आज नरेंद्र मोदींच्या नावाने ओरडनाऱ्या नेत्यांचे आई वडील त्यावेळी गप्प होते. ह्या जगाच दुर्दैव आहे ह्या जगात सर्वात जास्त नुकसान हे दुर्जांनाच्या उपद्वापापेक्षा सज्जनांच्या मौनाने जास्त केले आहे. विद्वान नेमकं योग्यवेळी मौन का बाळगतात हा मला पडलेला प्रश्न आहे. आणीबाणीच्या काळात बुद्धिवंत मौन बाळगून होते केवळ बोटावर मोजण्या इतके धर्मवीर भारती, कामलेश्र्वर, दुर्गाबाई भागवत, विष्णूपंत पांड्या हेच आणीबाणी विरोधी भूमिका घेत होते. बाकी साहित्यिक, लेखक, मौनात होते. सुखवांत सिंग तर उघडपणे आणीबाणीचे समर्थन करताना दिसले. आणि आज मात्र सर्वच्या सर्व स्वतःला कलम के धनी समजत रोज ओरडतात. आजच्या सत्तेची आणीबानिशी तुलना करतात, लाज वाटली पाहिजे अशा बुद्धिवंत लोकांना. आज डावे, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, सत्तालोलुप मंडळी ह्या सरकारवर यथेच्छ टिंगल करू शकतात, सरकार विरुद्ध लिहू शकतात, महाराष्ट्रातील काही एक दोन पत्रकार तर सकाळ सहा होण्याची वाट पाहतात आणि परिषद घेऊन फक्त कमरेखाली बोलत असतात, त्यांना ना आणीबाणीचा अभ्यास असतो ना लोकशाहीचा अभ्यास असतो. त्यांच्या हे ही लक्षात येत नाही की आपण हेच जे बोलतो आहोत ते आणीबाणीत बोलता येत नाही. तसा अधिकार नसतो आज जो आपण ओरडू शकतो, काहीही आपल्या वाटेल ते खोटं बोलू शकतो ते देशात, ह्याच सरकार मधील काही नेत्यांनी आणि बुद्धिवंत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या बलिदानानी हो लोकशाही जिवंत राहिली आहे त्यामुळे. काही जण आज आरोप करतात की ह्या सरकारने निवडणुकीत भ्रष्टाचार केल्यामुळ हे सरकार आलं. त्यांना दोन बाबी लक्षात आणून देऊ इच्छितो. बाबांनो जेंव्हा कर्नाटकात काँग्रेस सरकार येतं तेंव्हा तुम्हीच लोकं असतात लोकशाही जिवंत असल्याचे पुरावे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सला देता. आणि खरी निवडणूक प्रभावी करण कसं असतं हे १९७१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी ह्यांनी दाखुन दिलं आहे. ह्या आणीबाणीला काही महत्वाच्या कारणांपैकी कोर्ट कचेरीचे निकालही कारणीभूत आहेत. हे ही आत्ताच्या बोंबल्यानी लक्षात घेतलं पाहिजे. १९७१ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदार संघातून इंदिरा गांधी ह्या एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या होत्या, त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण ह्यांनी इलाहाबाद हायकोर्टात केस दाखल केली होती. त्यांचे वकील होते जे सध्याही ह्यात आहेत ते शांती भूषण, इंदिरा गांधी ह्यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला, आणि तो आरोप न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा ह्यांच्या समोर नंतर १८ मार्च १९७५/ १२ जून १९७५ ला सिद्धही झाला, आणि पुढे सहा वर्षासाठी कोणतीही निवडून इंदिरा गांधी ह्यांना लढवता येणार नाही असा निकाल दिला गेला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या पंतप्रधानाला कोर्टात हजर राहावं लागल्याचा हा पहिला प्रसंग होता हे मी तुम्हाला सांगितल पाहिजे, पण तुम्हाला मी हेही सांगितल पाहिजे आज जे म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा जज मोदीच ठरवतात त्यांना मी सांगितल पाहिजे की ह्याच न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा ह्यांना, तुम्ही इंदिरा गांधी विरुद्ध राजणारायन हा निर्णय योग्य दिल्यास तुम्हाला सुप्रीम कोर्टात जज म्हणून नियुक्त व्हाल असा निरोप न्यायमूर्ती टी. एस. माथूर ह्यांनी दिला होता. हा काय प्रकार होता ह्याचा विचार हे आजची आरोळी फोडणारी टीम करणार का.? आणीबाणीत सरकारच्या विरोधात बोलताही येत नव्हते, तात्काळ अटक करण्यात येत असे. संसदेत विरोधी पक्ष नसल्याने अनेक कायदे इंदिरा गांधी ह्यांनी तडकाफडकी बदलले, त्यामुळे संविधानाची पूर्ण मुळ किंमत कमी झाली. ह्यावर आजही कोणी बोलत नाही. १८ जानेवारी १९७७ इंदिरा गांधी ह्यांनी अचानक आणीबाणी मागे घेतली पण त्या एकोनविस महिन्यात काय झालं.? आणि त्या अगोदर चार सहा महिने देशात काय चालत होतं ह्याच उत्तर कोण देणार हा अजूनही माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे. आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत असतांनाही, त्या संदर्भातील शेकडो पुस्तक वाचतांना विषेतः इंदिरा गांधी ह्यांची मैत्रीण पूपुल जयकर लिखित इंदिरा गांधी, संजय गांधी ह्यांचे मित्र असलेले विनोद मेहता ह्यांचं the Sanjay story हे पुस्तक आणि त्यातील आणीबाणीचा भाग वाचतांना आजही अंगावर काटा उभा राहतो, त्यापेक्षा जास्त लाज वाटते आजही ह्या लोकशाहीत उभे असताना, खुलेआम ह्या सरकार विरोधात आग पाखडणारे तथाकथित बुद्धिजीवी ह्या सरकारला अघोषित आणीबाणी म्हणतात. त्यांची कीव करावीशी वाटते त्यांना संवेदना नसतात, ज्यांनी आणीबाणीत आपली कुटुंब उद्ध्वस्त केली. आपले परिवार बेचिराख केले ह्यांनी त्या व्यथा स्वतः भोगल्यात असे माणसं जेंव्हा मला भेटतात आणि त्या व्यथा सांगतात तेंव्हा आजही डोळ्याच्या कडा पाणावतात, म्हणून ह्या दिवसाला काळा दिवस म्हणल पाहिजे ह्या मताचा कोणतही तरुण नक्की होईल...

अंतिमहत्व

सत्यलेख · 25-06-2025 · 11:28 PM