हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

माविमं जिल्हा सल्लागार समिती बैठक

महत्वाचे
बचत गटांना कृषी प्रक्रिया उद्योगक्षेत्रात वाव- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- महिला बचत गटांना कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात वाव असून त्यात त्यांनी पदार्पण करावे, त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने त्यांना प्रशिक्षण, अर्थसहाय्य, बाजारपेठ उपलब्धता करुन द्यावी. जिल्हा वार्षिक योजनेतून द्यावयाच्या निधीसाठीही माविमंने प्रस्ताव सादर करावे,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी आज दिले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. कृषी उपसंचालक दीपक गवळी, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, सहा. मत्स्यव्यवसाय अधिकारी श्रीमती यु.व्ही.पवार, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सचिन सोनवणे, अजित भामरे. मॅग्नेटचे प्रकल्प अधिकारी अरुण नादरे, माविमंचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड यांच्यासह बॅंक प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे २२०३ महिला बचतगट आहेत. त्यात २२ हजार ८७० महिला सभासद आहेत. या महिलांसाठी नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय नागरी उपजीविकास अभियान, वॉटर सॅनिटेशन कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जाऊन त्यांच्यातील उद्यमशीलतेला चालना दिली जाते. गत वर्षात (सन २०२४-२५) ११६९ बचत गटांना ४४ कोटी १३ लक्ष ४० हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नवतेजस्विनी उपक्रमांतर्गत वडोद बाजार ता. फुलंब्री, रघुनाथ नगर ता. गंगापूर, शेरेगाव लासूर स्टेशन, बिडकीन ता. पैठण, ब्राह्मणगाव, अन्वी ता. सिल्लोड येथे सुधारीत शेळी पालन व शेळी खरेदी विक्री केंद्र स्थापन करण्याठी , तसेच जीवामृत व द्रव युनिट, दुग्ध व्यवसाय व पनीर उद्योग, मदर पोल्ट्री युनिट स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य महिला बचत गटांना देण्यात आले आहे. तेजस्विनी उपप्रकल्पांतर्गत टेंभापुरी ता. गंगापूर येथे दालमिल युनिट १०० महिला मिळून चालविणार आहेत.मिरची संकलन व प्रोसेसिंग युनिट, कृषी संच, धान्य क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट, वेअर हाऊस अशा विविध क्षेत्रात महिला बचत गट कार्यरत होत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीमार्फत राखीव असलेल्या निधीसाठीही प्रस्ताव सादर करण्यात येत आहे,असेही सांगण्यात आले. या सर्व प्रकल्पांसाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात यावे. त्यांना बाजारपेठ लिकिंग करुन द्यावे,असेही निर्देश अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर,

सत्यलेख · 06-06-2025 · 12:35 PM