हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, नवीन पीक कर्ज वाटप करा

महत्वाचे
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाकडून निवेदन

औंढा नागनाथ:राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) पक्षाकडून दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात सविस्तर वृत्त,शेतकऱ्याचे पूर्ण कर्ज माफ करून त्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा ही योजना पुन्हा सुरू करावी,लाडक्या बहिणीला १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात यावे अशा मागण्या केल्या. सदरील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष रमेशराव सानप यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आले. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे ,तालुकाध्यक्ष रमेशराव सानप, तालुका उपाध्यक्ष संभाजी चव्हाण ,तालुका सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राखोडे, सुरेशराव आहेर ,शकील अहमद,वसंतराव राखोडे, चंद्रकांत सुतारे विलास गायकवाड प्रकाश गायकवाड संतोष मोरगे शामराव देशमुख बाळासाहेब मगर ज्ञानेश्वर गीते बालाजी हाके चंद्रकांत गायकवाड गणपत राखोडे पांडुरंग राखोडे कुंडलिक राखोडे बालासाहेब मगर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

औंढा नागनाथ

सत्यलेख · 27-06-2025 · 8:56 PM