हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

*पत्रकार कल्याण योजनांमध्ये निकषांमधील दुरूस्त्या संबंधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखेकडून निवेदन*

महत्वाचे

*अकोला* - आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना,शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी योजना,सर्वच आजारांसाठी वैद्यकीय मदती, पुरावे नसतील तेथे लोकस्वातंत्र्य पत्रकारांच्या शिफारसी ग्राह्य धराव्यात.मयत पत्रकारांच्या वारसाला रू १० लाखांची मदत तथा नियम व अटींमध्ये शिथिलता आणि ईतर विविध दुरूस्त्यांच्या संदर्भात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम‌.देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा कार्यकारिणीकडून जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम यांचे नेर्तृत्वात जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी महासंचालक व माहितीसाठी मा.मुख्यमंत्र्याकडे विविध दुरस्त्यांच्या शिफारशीचे पत्र सादर केले. तसेच निवेदन जिल्हा कार्यकारिणी कडून महासंचालकांकडे पाठविण्यासाठी सादर करण्यात आले आहे. यावेळी विभागीय संघटक संतोष धरमकर, जिल्हा उपाध्यक्ष संघपाल सिरसाट,रमेश समुद्रे, सचिव मनोहर मोहोड, पत्रकार अबरार अहेमद, अजय जहागिरदार,विजय घनमोडे,संतोष मोरे,योगेश सिरसाट,दिपक सिरसाट, यांची मुसळधार पावसातही उपस्थिती होती. *आचार्य बाळशास्त्री पत्रकार सन्मान सन्मान योजनेसाठी* १) वयोमर्यादा ५८ वर्षे व अनुभवाची अट २० वर्षाची ठेवावी आणि यामध्ये अधिस्विकृती हाच पुरावा व अनुभवाचे कालावधी म्हणून गृहीत धरावेत.शिक्षणाची अट रद्द करावी. उत्पन्नाची अट रू ७ लाखांची ठेवावी.२) या योजनेचा लाभ पत्रकार मयत झाल्यावरही त्याच्या पत्नीला आजीवन मिळावा. ३) पत्रकारांच्या मृत्यूनंतर रू.१० लाखांची मदत दिली जावी.४) छोट्या वृत्तपत्रांवर उदरनिर्वाह होत नाही म्हणून काही व्यवसाय केल्यास त्या पत्रकारांचा अन्य व्यवसाय समजून योजनेपासून वंचित ठेऊ नये .अशा लघू- मध्यम वृत्तपत्र पत्रकारांवर अन्याय करू नये. ५) मुद्रक,प्रकाशक,संपादक या प्रेसलाईनमुळे येणाऱ्या अडचणींचे निकष रद्द करावेत. ६) दैनिक वृत्तपत्रातील पत्रकारांनी नोकरीचे ठीकाण बदलले तरी त्यांची सेवा सलग समजण्यात यावी. ७) छायाचित्रकारांच्या शासनाकडील मानधन पावत्या हेच पुरावे समजावेत. *शंकरराव चव्हाण सुवर्ण निधी योजना* १) या योजनेतील प्रस्तावांच्या मंजुराती अविलंब व्हाव्या. ही योजना व्याजात न चालवता अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुद करावी. २) आजार योजनेत सर्व आजारांसाठी योग्य वेळेत व प्रमाणित झेरॉक्स कागदपत्रांवर मदती मिळाव्यात.हे लाभ सर्वच पत्रकारांना तडजोडीने द्यावेत, यासाठी अधिस्विकृतीची अट ठेऊ नये. ३) मयतांच्या वारसांना रू.१० लाखांची मदत मिळावी. आजपर्यंत अनेक जाचक अटींमुळे राज्यातील असंख्य पत्रकारांवर अन्याय झाला असून,शासनाचे विधायक उद्देश खऱ्या अर्थाने सफल होण्यासाठी सर्वच योजनांच्या निकषांमध्ये बदल करून पत्रकार बांधवांना योग्य तो न्याय द्यावा या मागण्यांसाठी दुरूस्त्यांच्या संदर्भातील यापेक्षा विस्ताराने सुचविलेल्या सुधारणांचे ३ पानांचे निवेदन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून देण्यात आले आहे.

*अकोला*

सत्यलेख · 28-06-2025 · 11:57 AM