ओमप्रकाश देवडा विकास बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
हिंगोली : - ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगोलीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०३/०८/२०२५ रोजी हिंगोली येथील बँकेचे नविन मुख्यालय ओमभवन, तिरुपती नगर, हिंगोली येथे बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बँकेचे उपाध्यक्ष सुनिल देवडा, बँकेचे संचालक विठ्ठलदास मुंदडा, जुगलकिशोर धन्नावत, नरेंद्र मोदी, नरेंद्र अग्रवाल, प्रकाश गोयल, बजरंगलाल अग्रवाल, सुभद्रादेवी मंत्री, ज्ञानेश्वर मामडे, शशिकांत दोडल, राजेंद्र निमोदीया, गजाननराव देशमुख, आशिष काबरा, विजय अग्रवाल, राजेश अग्रवाल, राजु मुदिराज, अजित बज, संजय देवडा, बँकेचे तज्ञ संचालक तथा Board of Management चे अध्यक्ष एम.एम. बुद्रक, BOM चे सदस्य बालाजी सोनवणे, कमलकिशोर बगडीया, नवनित राठोर, सर्व शाखांचे शाखा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सदस्य, बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, पत्रकार, कर्मचारी बंधु व बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर जालनापुरे, सरव्यवस्थापक शशिकांत कंदी, सरव्यवस्थापक सौ. समता अग्रवाल, उपसरव्यवस्थापक सुधिर मुळे, सहाय्यक सरव्यवस्थापक ज्ञानदेव घुगे, श्रीराम माळोदे, संजय घोडेकर,संजय गवडे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थितीत होते. बँकेचे सरव्यवस्थापक शशिकांत कंदी यांनी अहवाल वाचन केले.
बँकेचे अध्यक्ष. प्रकाशचंद सोनी यांना सकल जैन सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने 'जैन भूषन' पदवी मिळाल्या बद्दल त्यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष . सुनिलजी देवडा यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांचा सहकार क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल 'मराठवाडा भूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मालाड (पुर्व) मुंबई शाखेचे शाखा सल्लागार सदस्य श्री रतनजी पोद्दार यांनी त्यांच्या कलाकुसर ने तयार केलेल्या स्व. ओमप्रकाशजी देवडा यांचा फोटोचे अनावरण करण्यात आले.
बँकेचे संचालक . नरेंद्रजी मोदी यांना लॉयन्स रॅपिडच्या वतीने समाज उपयोगी कार्य केल्या बदल त्यांना Best President- Silver Award पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. त्या अनुषंगाने त्यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अहवाल वर्षात बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीच्या थोर विभूती आणि शहीद झालेल्या जवानांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बँकेचे सरव्यवस्थापक शशिकांत कंदी यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले व त्यास उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.
सन २०२४-२५ या अहवाल वर्षात बँकेचे Statutory Auditor M/s. Arth & Associates, Akola यांनी बँकेस 'अ' ग्रेड दिला आहे. अहवाल वर्ष अखेर नियमीत सभासद १९०५६ इतके असून भागभांडवल रुपये १९.७६ कोटी आहेत.
अहवाल वर्षा अखेर बँकेच्या एकूण ठेवी रुपये ८०६.५० कोटी तर कर्ज रुपये ४७२.२३ कोटी असून बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. ६.३८% व नेट एन.पी.ए. १.१४% आहे, बँकेची एकुण गुंतवणूक रुपये ३१८.०८ कोटी तसेच राखीव निधी रुपये
१०५.०० कोटी व बँकेचा निव्वळ नफा रु. ३.४६ कोटी झाला आहे. वर्ष २०२४-२०२५ करिता मा. संचालक मंडळा
द्वारे १०% लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली.
बैंक ही रिझर्व बँकेच्या FSWM Category (Financialy Sound & Well Managed Bank) मध्ये आहे. बँकेने बँकेच्या ग्राहकांस्ठी Mobile Banking सुविधा सुरु केली आहे व ग्राहक UPI सुविधेचा लाभ घेत आहेत.
सहकाररत्न स्व. ओमप्रकाशजी देवडा यांच्या स्मरणार्थ बैंके तर्फे उत्कृष्टबँकींग व्यवसाय केल्या बद्दल शाखेस तथा कर्मचायांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
बँकेचे आर.बी.आय. वर्ष २०२४-२५ चे ऑडीट झाले आहे. Statutory Audit, IS, VAPT, आहे.
यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी, उपाध्यक्ष सुनिल देवडा, बँकेचे व्यवस्थापकीय संचाल जालनापुरे यांनी यांनी आपले मनोगत मध्ये बँके बदल विविध मुद्दावर माहिती दिली.
बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त बँकेच्या मा. संचालक व कर्मचायांसाठी Cyber Security या विषयावर प्रभाव तकने धारानी नत्त विकिगण मंकीकर यांनी मार्गटर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तथा आभार प्रदर्शन बैंकेचे उपसरव्यवस्थापक सुधिर मुळे यांनी केले
हिंगोली : -
सत्यलेख ·
03-08-2025
·
6:49 PM