जेष्ठ प्रशिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गुणगौरव सोहळा.
हिंगोली दिनांक 6 ऑगस्ट 2025 येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या वर्ष 1988_1989 च्या माजी विद्यार्थ्यांनी गुरुवर्य हिम्मतराव मोरे गुरुजी यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ने ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार बहाल केल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोली चे माजी उपनगराध्यक्ष काशिनाथराव बांगर, सत्कारमूर्ती हिम्मतराव मोरे गुरुजी मुख्य अतिथी हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मेजर पंढरीनाथ घुगे , अतिथी म्हणून भागवतराव चव्हाण, कबड्डी खेळाडू दतराव बांगर ,रावसाहेब सूर्यतळ व जिल्हा परिषदेच्या वर्ष1988- 1989 चे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खाकी बाबा मेमोरियल स्कूलचे मुख्याध्यापक शेख रहीम तर प्रास्ताविक प्रा.डॉ. सुखदेव बलखंडे व आभार प्रदर्शन पत्रकार प्रकाश इंगोले यांनी केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी काशिनाथ बांगर व शेख नजीर यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्कारमूर्ती हिम्मतराव मोरे गुरुजी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार व्यक्त करत शैक्षणिक मूल्य व आचरण अतिशय उत्तुंग ठेवून कार्य करावे समाज आपल्या कार्याची दखल घेतो असे मनोगत व्यक्त केले.
हिंगोली शहरात क्रीडा सांस्कृतिक कार्यातील ओळखीचा चेहरा म्हणजेच हिम्मतराव मोरे गुरुजी आहेत, माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे गुरूच्या प्रती असलेली श्रद्धा व विश्वास असा आहे असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी मेजर पंढरीनाथ घुगे यांनी व्यक्त केले.
सत्कार आयोजनामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी ज्यामध्ये शेख रहीम, सय्यद नजीर, राघो वैरागड, डॉ.प्रा. सुखदेव बलखंडे, पठाण नसीर, उत्तम इंगळे, किरण राजपूत, बालकिशन शिंदे, सुनील फटाले, काशिनाथ बांगर, प्रकाश इंगोले, संजय दराडे, श्री धुळे,श्री उदावंत आदी उपस्थित होते त्यांनी परिश्रम घेतले.
हिंगोली
सत्यलेख ·
07-08-2025
·
5:38 PM