हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

हरिबापु कऱ्हाळे यांच्याकडून साडे पाच लाख रुपयाची देणगी

महत्वाचे
हरिबापु कऱ्हाळे यांच्या देणगीतून तसेच तसेच हनुमान मंदिर कमिटी यांच्याकडून अतिशय उत्तम असे टिन शेड चे केलेले काम गावकऱ्यांच्या उपयोगी येणार आहे.

हरिबापु कऱ्हाळे यांच्याकडून साडे पाच लाख रुपयाची देणगी हिंगोली शिवाजी कऱ्हाळे हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील हरिबापु कऱ्हाळे या शेतकऱ्यांनी गावामध्ये लग्न समारंभ व साखरपुडा असो किंवा बाहेर गावाहुन येणाऱ्या दिंड्या यासाठी पाऊस पाणी वारा यांच्यापासून निवारा मिळावा म्हणून डिग्रस येथे असलेल्या समाज मंदिराच्या वर टिन शेड करण्यासाठी डिग्रस येथील हरिबापु कऱ्हाळे यांनी टीन सेड करण्यासाठी पाच लाख पन्नास हजार रुपयाची देणगी ग्रामस्थां दिली. हरिबापु कऱ्हाळे यांच्या देणगीतून तसेच हनुमान मंदिर कमिटी यांच्याकडून अतिशय उत्तम असे टिन शेड चे केलेले काम गावकऱ्यांच्या उपयोगी येणार आहे. हरिबापु यांनी देणगी दिली यावेळी गोविंदराव गुरुजी कऱ्हाळे, माजी सरपंच गंगाधर साखरे, विष्णू कऱ्हाळे, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे,अनिल शेळके, परमेश्वर कऱ्हाळे, गजू कऱ्हाळे, अशोक काळे, लक्ष्मण गोरे, प्रल्हाद कऱ्हाळे, बाळू पाटील, पांडू पाटील, शिवरामजी कऱ्हाळे, यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरी बापू कऱ्हाळे यांनी साडेपाच लाख रुपये निधी ग्रामस्थांच्या उपयोगासाठी दिल्याने हरी बापू कऱ्हाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. चांगल्या कामासाठी जो करतो दान.. त्यांना समाजामध्ये मिळतो चांगला माण सन्मान.

हिंगोली

सत्यलेख · 19-07-2025 · 1:26 PM