आयोजक तथा अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी आयोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली.
हिंगोली (प्रतिनिधी)- महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने व हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्या पुढाकाराने २७ वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय फेन्सिंग तीन दिवशी स्पर्धा शुक्रवार दि.८ ऑगस्ट रोजी पासुन होणार असुन स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी आयोजक अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषद मध्ये आयोजक तथा अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी आयोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, निरीक्षक प्रा.डॉ.पांडुरंग रणमाळ, हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष कल्याण देशमुख, उपाध्यक्ष प्रा.डॉ.आनंद भट्ट, सचिव संजय भुमरे, सहसचिव नरेंद्र रायलवार आणि राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थित होणार असून दि.८ ऑगस्ट ते दि.१० ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर फेन्सिंग स्पर्धा होणार असून सदरील स्पर्धा ही जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता हिंगोली येथे होत असल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्पर्धा कालावधीत खेळाडूंना भोजन, निवास, वाहन व्यवस्था या संदर्भात सुद्धा नियोजन करण्यात आलेले असून स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभागामार्फत सुसज्ज रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक सुद्धा ठेवली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आ.हेमंत पाटील यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगोदरच आढावा घेतला आहे. स्पर्धा परिसरातील प्रवेशद्वाराला हिंगोली व परभणी जिल्हयातील क्रीडा विभागात महत्वपुर्ण योगदान असलेले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त स्व.प्रा.यु.डी.इंगळे यांचे नांव देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हि स्पर्धा १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठीची राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा दि.८ ते १० ऑगस्ट रोजी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा (मक्ता), हिंगोली येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरक्षा, निवास, भोजन, वाहन व्यवस्था, आरोग्य तपासणी आणि मैदानी व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हिंगोली जिल्ह्याला प्रथमच अशा दर्जेदार फेन्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाल्याने हिंगोली सह सर्व राज्यांची लक्ष या स्पर्धेवर लागले आहे. या पत्रकार परिषदेला संघटनेचे सर्व सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.
हिंगोली
सत्यलेख ·
07-08-2025
·
5:35 PM