जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांची उपस्थिती
औंढा नागनाथ: शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) पक्षाची गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी११ वाजता शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीस दिलीपराव चव्हाण जिल्हाध्यक्ष, मनीष आखरे मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रमेशराव सानप यांनी जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे यांचा हार घालून सत्कार केला.
दिलीपराव चव्हाण म्हणाले,आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका , ग्रामपंचायत निवडणूका आहेत .या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते उभे करायचे आहेत. निवडणुकीत युती असेल तर आपण युती सोबत राहू युती नसेल तर स्वबळावर लढू यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे जोमाने काम करावे. ज्या जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणामध्ये उमेदवार कार्यकर्ते जे सांगतील ते आपण करूयात. याचबरोबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा देखील केली.
औंढा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सानप यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली .या बैठकीस दिलीपराव चव्हाण जिल्हाध्यक्ष, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे ,तालुकाध्यक्ष रमेशराव सानप, तालुका उपाध्यक्ष संभाजी चव्हाण ,तालुका सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राखोडे, सुरेशराव आहेर ,शकील अहमद,वसंतराव राखोडे, चंद्रकांत सुतारे विलास गायकवाड प्रकाश गायकवाड संतोष मोरगे शामराव देशमुख बाळासाहेब मगर ज्ञानेश्वर गीते बालाजी हाके चंद्रकांत गायकवाड गणपत राखोडे पांडुरंग राखोडे कुंडलिक राखोडे बालासाहेब मगर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे प्रस्तावना रमेशराव सानप सूत्रसंचालन दिलीप राखोडे तर आभार प्रदर्शन शकील अहमद यांनी मानले
औंढा नागनाथ:
सत्यलेख ·
27-06-2025
·
8:52 PM