हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

जेसीआय वाशिम सिटी तर्फे निःशुल्क प्राणायाम व ध्यान साधना शिबिराचे आयोजन

महत्वाचे
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या जेसीआय वाशिम सिटी तर्फे निःशुल्क प्राणायाम व ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वाशिम, :– सामाजिक कार्यात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या जेसीआय वाशिम सिटी तर्फे आजपासून ते २१ जून २०२५ दरम्यान निःशुल्क प्राणायाम व ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी खुले असून रोज सकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत हॅपी फेसेस, हिंगोली नाका, वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ओव्हरवेट, अंडरवेट, बी.पी., डायबेटीस, पोट व पाठदुखीचे विकार तसेच मानसिक व भावनिक अस्वस्थता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणायाम आणि ध्यान साधनेचे तंत्र शिकवले जात आहे. यामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकास होतो. या शिबिराचे मार्गदर्शन शासन मान्य व्हॅल्यूअर अभियंता आणि ध्यान साधक श्री. रुपेश लढ्ढा करीत आहेत.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी २०२५ चे अध्यक्ष जेसी पंकजकुमार बांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "प्राणायाम आणि ध्यान ही केवळ योगपद्धती नाही, तर ही एक जीवनशैली आहे जी आपल्याला अंतर्बाह्य सशक्त बनवते. मानसिक ताणतणाव, अस्वस्थता आणि जीवनातील असमाधान यावर मात करण्यासाठी ध्यान हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे." त्यांनी पुढे असेही समाजाच्या आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनगुणवत्तेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी जेसीआय वाशिम सिटी नेहमीच तत्पर आहे.या वर्षीच्या शिबिरासाठी २०२५ चे अध्यक्ष जेसी पंकजकुमार बांडे, सचिव जेसी प्रणय परतानी, झोन डायरेक्टर बिझनेस जेसी सौरभ गट्टानी, झोन व्हाईस प्रेसिडेंट जेसी राम जाधव, झोन सदस्य डॉ. रोशन व्यास, रवी बुंदे, पंकज बाजड, तसेच जेसी विपुल अग्रवाल, जेसी अखिलेश लढ्ढा, जेसी मयूर चुंबळकर, सीए आनंद डोड्या, जेसी सुमित खात्री, जेसी संदीप बाहेती, जेसी सागर दायमा व अनेक पदाधिकारी आणि सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.एकनाथ सुरुशे व संजय व्यास यांचेही या शिबिरात विशेष योगदान राहिले आहे.

वाशिम,

सत्यलेख · 15-06-2025 · 3:00 PM