हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

राजर्षी शाहू महाराज यांची 151वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी.

महत्वाचे
प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातून प्रथम आलेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार 5000 रु व ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

हिंगोली :प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली च्या वतीने लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची 151 जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दिनांक 26 जून सकाळी 10:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामानव महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार श्री तानाजीराव मुटकुळे उपस्थित होते. प्रमुखअतिथी श्री कांबळे साहेब -अतिरिक्त जिल्हाधिकारी हिंगोली, श्रीमती छाया कुलाल -प्रादेशिक उपायुक्त लातूर, श्री यादव गायकवाड -सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, सिद्धार्थ गोवंदे - प्रकल्प अधिकारी बार्टी, अमोल घुगे विशेष अधिकारी, आत्माराम वागतकर कार्यालयीन अधीक्षक, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री अंकेत जाधव -आयकर विभाग, श्री अक्षय राठोड -असिस्टंट कमांडंट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती गीता गुटठे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे भारतीय संविधानाच्या उद्देशिका फेम व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला, संविधान उद्देशिकेचे वाचनही सामूहिकरीत्या करण्यात आले. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त डॉ, वर्षा कुरील, प्रा. विक्रम जावळे, शांताबाई मोरे,बबन मोरे, नीटकॉन बार्टी सेंटर, रेनबोचे प्राचार्य विजय कांबळे, दिगंबर काळे, सरजू देवी विद्यालयाचे श्री संजय घुमरे श्रीमती सोवीतकर मॅडम,आदीं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातून प्रथम आलेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार 5000 रु व ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ योजने अंतर्गत श्रीमती संगीता राजू राठोड यांना पाच लाख रुपयाचा सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले, अंकित जाधव व अक्षय राठोड यांनी उपस्थित त्यांना स्पर्धा परीक्षा विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. श्री कांबळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी अध्यक्ष विचार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी गीते यांनी केले, तर कार्यक्रमाचे शेवटी आभार श्रीमती वर्षा घुगे यांनी व्यक्त केले, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण हि करण्यात आले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागातील सर्व कर्मचारी व बार्टी समतादूत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली

सत्यलेख · 26-06-2025 · 6:31 PM