हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

खबरदार धान्य लाभार्थ्याची फसवणूक कराल तर कारवाई निश्चित

महत्वाचे
(तालुका पुरवठा निरीक्षन अधिकारी विशाल लोहटे यांचा स्वस्त धान्य दुकानदारांना इशारा)

सेनगाव (बबन सुतार) राज्यातील पावसाळा स्थिती व पूर स्थिती लक्षात घेता राज्य सरकारने धान्य लाभार्थ्यांना तीन महिन्याचे एकत्रित धान्य एकाच महिन्यात देण्याचे निर्णय घेतल्याने हा डाटा ई पास मशीनवर राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात आली असून तालुक्यातील धान्य लाभार्थी यांना ई-पास मशीनवर लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ज्यादा ठसे घेऊन धान्य लाभार्थ्यांची फसवणूक कराल तर अशा गैर प्रवृत्ती विरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना दिला आहे. राज्यातील पूर स्थिती व पावसाळा परिस्थिती या अनुषंगाने राज्य शासनाकडून सेनगाव तालुक्यातील विविध कल्याणकारी धान्य पुरवठा योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून दरमहा दिल्या जाणारे मोफत धान्य या माहे जून मध्ये पुढील माहे जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्याचे मोफत धान्य एकाच महिन्यात देय करण्याचे आदेश लागू करण्यात आले असून त्या अनुषंगाने इपॉस मशीन वर डाटा राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे परंतु तालुका पुरवठा विभागा अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांना माहे जून या एकाच महिन्याचे धान्य वाटप केले असल्याने उर्वरित माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे धान्य हे शासकीय गोदामात जमा करण्याची व स्वस्त धान्य दुकाना द्वारपोच वाहतूक करण्याची प्रक्रिया चालू असल्याने तालुक्यातील धान्य लाभार्थ्यांनी आपण उचल केलेल्या धान्याची योग्य शहानिशा करूनच ईपास मशीनवर आपला अंगठा किती वेळा दुकानदार लावतो किंवा आपण ई पास मशीनवर केलेला व्यवहाराची ऑनलाईन पावती घेणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे तर तालुक्यातील धान्य लाभार्थ्यांना तुम्ही आता बोटाचे ठसे किंवा ओटीपी द्या नंतर धान्य प्राप्त होता तुम्हाला धान्य देऊ असे खोटी आश्वासन देऊन धान्य लाभार्थ्याची फसवणूक केल्यास अशा गैर प्रवृत्ती करणाऱ्या विरुद्ध जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही निश्चित असल्याचा इशारा तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे यांनी दिला आहे तसेच धान्य लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे एकापेक्षा अधिक किंवा तीन वेळा अंगठ्याचे ठसे घेतल्यास तेवढ्या महिन्याचे धान्य उचल करून घ्यावे किंवा इ पोस मशीन वरील होणाऱ्या व्यवहाराची पावती घ्यावी जेणेकरून लाभार्थ्यास किती महिन्याचे व किती व्यक्तीचे किती किलो धान्य प्राप्त झाले हे समजण्यास सोयीचे होईल यासाठी खात्रीपूर्वक धान्याचा व्यवहार धान्य लाभार्थ्यांनी करावा व अंतोदय लाभार्थी यास प्रतिमाह 15 किलो गहू और 20 किलो तांदूळ असा एकूण 35 किलो धान्य प्रतिक कार्ड दिल्या जातो तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रति लाभार्थी प्रतिमाह 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते तालुक्यातील धान्य पात्र कुटुंबातील व्यक्तींना राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य दिल्या जात नसेल अथवा अडवणूक केल्या जात असेल अशा धान्य लाभार्थ्यांनी संकोचपणे संबंधित दुकानदाराची तक्रार पुरवठा विभाग तहसील अंतर्गत करावी. व ज्या धान्य पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांची ई केवायसी करणे अद्याप पर्यंत बाकी आहे अशा कुटुंबातील सदस्यांनी इ के वाय सी ईपॉस मशीन वरून करून घेतल्या जात आहे त्यामुळे ई केवायसी करताना ईपॉस मशीनवर लाभार्थ्यांना बोटाचे ठसे देणे बंधनकारक असून ही केवायसी करण्याच्या नावाखाली बोटाचे ठसे घेऊन धान्याचा अपहार किंवा फसवणूक केली जाणार नाही याची खात्री लाभार्थ्यांनी करावी व आपणाला व आपल्या कुटुंबाला राज्य शासनाकडून योजनानिहाय होत असलेला मोफत धान्य पुरवठा हा शासकीय नियमानुसार प्राप्त करून घ्यावा असे आवाहन तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे व तालुका पुरवठा निरीक्षक अभिजीत बोबडे यांनी केले आहे.

सेनगाव

सत्यलेख · 15-06-2025 · 2:49 PM