हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

सेनगाव तहसील पथकाकडून 40 ब्रास अवैध रेती साठा जप्त करून कारवाई

महत्वाचे
तहसीलदार सखाराम मांडवगडे रेतीमाफीयाविरुद्ध ॲक्शन मोडवर

सेनगाव (तालुका प्रतिनिधी) सेनगाव तालुक्यातील रेती रेती माफिया विरोधात तहसील प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले असून चक्क तहसीलदार सखाराम मांडवगडे दर दिवशी अवैध रेती साठ्यावर कारवाई करत असल्याने आजदि .13 जून रोजी ब्रह्मवाडी येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या 30 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला असून व तसेच कडोळी येथे 10 ब्रास असे एकूण 40 ब्रास रेती साठा जप्त करून एक टिप्पर दोन ब्रास रेती सह सेनगाव पोलीस स्थानकात जमा करून कारवाई करण्यात आल्याने चक्क तहसीलदार सखाराम मांडवगडे आत्ता अवैध रेतीमाफियाविरुद्ध ॲक्शन मोडवर आले असल्याची पहावयास मिळत आहे. सेनगाव तालुक्यात अनेक रेतीघाट कार्यरत असून सदर रेती घाट हे जिल्हा महसूल प्रशासनाकडून लिलाव न झाल्याने तालुक्यात रेतीमाफियाकडून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करण्याचा धडाका हा खेळ रात्रीस चाले याप्रमाणे रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून त्यांची अव्वाच्या सव्वा दरात विक्री करण्याची बाब नित्याचीच असून या गंभीर बाबीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होत असलेल्या अवैध रेती उपसा करणाऱ्या रेतीमाफीया विरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिल्याने सेनगाव तहसीलदार सखाराम मांडवगडे व त्यांच्या महसूल टीमने सेनगाव तालुक्यात प्रतिदिन अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर कारवाई करण्याचे सत्र कायम असून त्यांनी दिनांक 13 जून रोजी तालुक्यातील ब्रह्मवाडी शिवारात 30 ब्रास तर कडोळी येथील 10 ब्रास असे एकूण 40 ब्रास अवैध रित्या साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली तसेच आवेद रेती वाहतूक करणारे 2 ब्रास रेतीसह एक टिप्पर सेनगाव पोलिसांनाच्या स्वाधीन करून कारवाई करण्यात आली आहे या सतत कारवाई सत्रमुळे अवैध रेतीमाफियामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. यापुढे अवैध रेती उपसा व विक्री करणाऱ्या रेतीमाफियाच्या विरोधात कडक कारवाई केल्या जाणारा असून यासाठी मंडळनिहाय पथके स्थापन केल्या असल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली असून अशा गैर कायदेशीर रेती उपशाविरुद्ध सतत कारवाईचे सत्र चालूच ठेवणार असल्याचा इशारा तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिला आहे या 40 ब्रास रेती व एक टिप्पर दोन ब्रास रेती सह केलेल्या जप्ती कारवाई पथकामध्ये पथक प्रमुख मंडळ अधिकारी दंडीमे, ग्राममहसूल अधिकारी प्रदीप इंगोले, रवी इंगोले, नामदेव ढोले, राऊत, संतोष इंगळे, मिलिंद गरपाल, महसूल सेवक गिरी, व वाहन चालक आर. एस. सावंत आदींचा पथकामध्ये समावेश होता.

सेनगाव

सत्यलेख · 15-06-2025 · 2:47 PM