हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

*पार्थिव शिवलिंग पूजनाला शिवभक्तांची गर्दी हजारावर भाविक शिवभक्त पूजनाला उपस्थित*

महत्वाचे
कार्यक्रमाला गांगलवाडी येथील सिद्धनाथ संस्थानचे गुरुवर्य परमपूज्य आत्मानंद महाराज व खडेश्वर संस्थान खटकाळी हिंगोलीचे परमपूज्य सुमेरपुरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंगोली दि.७ /-आई जगदंबा नवरात्र उत्सव समिती एनटीसी हिंगोली व सद्गुरु सेवा प्रतिष्ठान हिंगोली यांच्या वतीने एनटीसी येथील छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात पार्थिव शिवलिंग पूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला गांगलवाडी येथील सिद्धनाथ संस्थानचे गुरुवर्य परमपूज्य आत्मानंद महाराज व खडेश्वर संस्थान खटकाळी हिंगोलीचे परमपूज्य सुमेरपुरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या दोन्ही गुरुवर्यांचा सत्कार आयोजक उत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण देशमुख व सद्गुरु प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत पाठक महाराज यांनी केला. पार्थिव शिवलिंग पूजना अगोदर गायक तुकाराम जाधव, संस्कृती पिंगळकर यांच्या समवेत अथर्व देशमुख, अनिरुद्ध पांडे, तेजस रत्नपारखी यांनी भजन व भक्ती गीते सादर केली यानंतर मुख्य सोहळा पार्थिव शिवलिंग पूजन संपन्न झाले .पार्थिव शिवलिंग पूजन कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदनाताई भुसांडे,अनिताताई शिंदे, ज्योतीताई कान्हे,कावेरीताई रोडगे, योगिताताई देशमुख, कुंजनाताई टाक, राधाताई बियाणी,छायाताई मगर, योगिताताई जोशी, राखीताई झंवर,दिपालीताई घन,दीपाताई भक्कड, स्वातीताई जोशी, संध्याताई देशमुख, सविताताई चक्रवार, संगीताताई मामडे, शिल्पाताई नरसीकर, दिपालीताई पोहेकर घण, संगीताताई निलावार, पूजाताई पारस्कर, मृणालिनीताई पत्की, कु. सपना राऊत,कु. वैष्णवी खेत्रे, कु. सायली इंगळे, कु. अंकिता पवार, कु. शितल झाडे, कु. श्रद्धा चौतमल, कु. प्रीयल देशमुख, कु. साक्षी दवणे,कु. श्रुती देशपांडे यांच्यासह महिला संयोजन समितीने परिश्रम घेतले. यावेळी गुरुवर्य महाराज धोंडीराज पाठक, नागेश पाठक दारेफळकर, व हजारो भावी भक्त कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

हिंगोली

सत्यलेख · 07-08-2025 · 5:33 PM