हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

शेख खलील बेलदार यांचा AIMIM पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

महत्वाचे
प्रदेशाध्यक्ष मा. खा. इम्तियाज जलील साहेब लवकरच हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार

हिंगोली,:- शेख खलील बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक 22 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील साहेब हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर लवकरच येत आहेत. यावेळी हाजी अब्दुल खुद्दस साहेब, सय्यद साबेर भाई नांदापूरकर, पठाण इम्रान खान, इरफान पठाण, मुद्दस्सर शेख कौसर, शेख समीर, शेख आयुब, पठाण नजीब खान व इतर उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी व मा. खा. इम्तियाज जलील तसेच पक्षाचे नेते मा. समीर साजिद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सदरील प्रवेश झाला असल्याचे शेख खलील बेलदार यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता राखून समाजसेवा व सर्व समाजातील गरजू गरीब शेतकरी कष्टकरी गरजू नागरिकांची तसेच अडचणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत करून कामाच्या माध्यमातून आम्ही पक्ष संघटन मजबूत करू व सर्व समाजातील घटकांना घेऊन चालू असेही त्यांनी नमूद केले. हिंगोली जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी हिंगोली येथील संपर्क कार्यालयास भेट द्यावी यावेळी AIMIM पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दाखवावी असे आवाहन सुद्धा शेख खलील बेलदार यांनी केले.

हिंगोली,:-

सत्यलेख · 27-07-2025 · 10:58 AM