हिंगोली महाराष्ट्र * दैनिक मराठी * वर्ष - ०२ रा

Date

हिंगोली येथे हरित मित्र चाचणी स्पर्धा परीक्षेचे उत्साहात आयोजन व सहभागी विद्यार्थ्यांना देशी झाडांचे वाटप करण्यात आले.

महत्वाचे

हिंगोली :- एस आर दळवी (आय) फाउंडेशन व रेनबो कॉम्प्युटर्स हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंगोली टीचर फोरम यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरित मित्र चाचणी स्पर्धा 2025 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा इयत्ता पहिलीपासून पुढे सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली होती. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी पासून पुढे अशाप्रकारे तीन गट तयार करण्यात आले होते. तीनही गटांना स्तरानुसार वेगवेगळी प्रश्नपत्रिका पुरविण्यात आली. परीक्षेचा वेळ हा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार सकाळी 11 पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर चाचणीसाठी आलेल्या दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वृक्षरोप भेट देण्यात आले. या परीक्षेच्या माध्यमातून "निसर्गाचे रक्षण करा व ज्ञानाचे संगोपन करा" असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. " मी एक झाड लावेल आणि त्याचे जपून संवर्धन करेल, " अशी प्रतिज्ञा करत त्यावर विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. परीक्षा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमातून उपलब्ध होती. परिसरातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमास उत्साहात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमा साठी रेनबो चे संचालक विजयकुमार कांबळे, प्रा. गजानन बांगर,टीचर फोरम चे राजेश्वर पवार, डॉ.मीरा पोपळघाट, हरिभाऊ मुटकुळे, गोरखनाथ कदम, बालाजी टेकाळे, अनिल गायकवाड,मनिषा पवार, विठ्ठल गवळी,दिगंबर काळे,अंकुश देशमाने, बालाजी टोम्पे, नागेश जोंधळे, नेहा इंगोले हे उपस्थित होते व यांनी विशेष परिश्रम घेतले.या वेळी बार्टी चे जर्मन भाषा प्रशिक्षण अद्ययनार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हिंगोली

सत्यलेख · 07-06-2025 · 7:19 PM