माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची प्रतिपादन
हिंगोली- स्वास्थ्यासाठी अगदी स्वस्त उपाय म्हणून सर्वांनी योग केलाच पाहिजे निरोगी राहण्यासाठी हा एक स्वस्त उपाय असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.
स्व. लक्ष्मणराव पाटील सेवाभावी संस्था आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने तिरुपती नगर हिंगोली येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली मुख्य कार्यालय असलेल्या ओम भवन परिसरात जागतिक योग दिनानिमित्त पाच दिवसीय योग शिबिराचे उदघाटन आज करण्यात आले. सकाळी साडेपाच ते सात या दरम्यान एकोणवीस जून पर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून यापुढेही नित्य योग वर्ग सुरू ठेवणार असल्याचे स्व. लक्ष्मणराव पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गजानन सावके यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, ॲड सतीशराव देशमुख,ओमप्रकाश देवडा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जालनापुरे,संचालक दिपकराव सवनेकर, बँकेचे अधिकारी माहोरे यांचे सह पतंजली योग समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य कुंडलिकराव निर्मले, हिंगोली जिल्हा भारत स्वाभिमान न्यास पतंजली योग समितीचे जिल्हाप्रभारी विठ्ठल सोळंके, सहप्रभारी बालासाहेब हरण, अशोक पवार, महामंत्री शितल तापडिया, संवाद प्रभारी राजेश दार्वेकर, योगशिक्षक रमेश काळे, मंगल काळे, सुषमा होकरणे, स्वाती वरखेडकर आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाने योग शिबिरास प्रारंभ करण्यात आला. विठ्ठल सोळंके यांनी अष्टांग योग बाबत सविस्तर माहिती देऊन योगासने, प्राणायाम करून घेतला. जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने देखील स्व.लक्ष्मणराव पाटील सेवाभावी संस्थेकडून पतंजली योग समिती हिंगोली यांच्या हस्ते बँकेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुढील चार दिवस देखील वेगवेगळ्या योग शिक्षकांच्या माध्यमातून योग मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व तिरूपती नगरच्या सर्वयोग प्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोली
सत्यलेख ·
15-06-2025
·
2:45 PM