लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत उत्कृष्ट वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पालम सिटीजन्स चे संपादक शेख गौसोद्दीन शहाबोद्दीन यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पालम (प्रतिनिधी):
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत उत्कृष्ट वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पालम सिटीजन्स चे संपादक शेख गौसोद्दीन शहाबोद्दीन यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध माध्यमांतील पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले. यामध्ये राज्य सरकारच्या पत्रकारांसाठी असलेल्या योजना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान, बातमी संकलन, संपादन आणि प्रूफ रिडिंग याबाबत तज्ज्ञांनी सखोल माहिती दिली.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, माध्यमांनी निवडणूक काळात जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट केली आहे. त्यांच्या मते, पत्रकार समाज आणि प्रशासन यांच्यातील दुवा असून पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी ते आवश्यक आहेत.
या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काले, रेसिडेंट डिप्टी कलेक्टर अनुराधा डालकरी, डिप्टी जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे, प्रो. दीपक रंगारी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन विधाते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद ढोंगडे यांनी केले. कार्यक्रमाला विविध भाषांतील मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थिती लावून रंगत आणली.
पालम
सत्यलेख ·
22-07-2025
·
12:40 PM